पेलोपनीशियन युद्ध
पेलोपनीशियन युद्ध : ग्रीसच्या स्वामित्वासाठी अथेन्स व स्पार्टा या दोन प्रबळ ग्रीक नगरराज्यांत इ. स.पू. ४३१ – ४०४ या दरम्यान सतत संघर्ष चालू होता. पेलोपनीशियन युद्ध त्यातूनच उद्भवले. हे युद्ध प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनाचा अत्यंत आवडीचा विषय झाला.